Ladki Bahin yojana new लाडकी बहीण योजना 2024:
या महिलांना मिळणार नाही पैसे –
महाराष्ट्र सरकार द्वारे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. लवकरच या योजनेची लाभार्थी यादी जाहीर होणार आहे. ज्या महिलांचे नाव या यादीत येणार नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
काय म्हणाले अजित पवार ? –
राज्यातील महिलांना रक्षाबंधनची भेट म्हणून लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये दिले जाणार आहेत. हे ३००० रुपये जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे असणार आहेत. असे अजित पवार यांनी सांगितले.
इथे करु शकता अर्ज-
महिला हा अर्ज नारी शक्ती दूत ॲप वर ऑनलाईन देखील करु शकतात किंवा अंगणवाडी सेविका किंवा पंचायतीचे बालविकास प्रकल्प अधिकारी, महापालिकेचे वाॅर्ड ऑफिस इथे करु शकतात.
👉👉👉Application link , 🔗 👈👈👈
माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
आधारकार्ड
बैंक खाते पासबुक
रेशन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
अधिवास प्रमाणपत्र/ जन्माचा दाखला
योजनेच्या अटींचे पालन करण्याबाबत हमीपत्र
या महिला आहेत पात्र –
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
विवाहित, घटस्फोटीत, निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील. आता २१ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मुलींना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ ते ६० वर्षे ही वयोमर्यादा आहे.
महिलेचे बैंक खाते असले पाहिजे.
महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त नसावे.
ट्रॅक्टर वगळून दुसरे चारचाकी वाहन नसावे.
महाराष्ट्र सरकार महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी योजना राबवत असतात. महाराष्ट्र सरकारने आता लाडकी बहीण योजना 2024 ही नवीन योजना सुरू केली आहे. महिलांना आर्थिक मदत करणे व आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान जुलै व ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये महिलांच्या बॅंक अकाउंट वर जमा होणार आहेत.
oo
Post a Comment
आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!