महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना (* Maharashtra Unemployment Allowance Scheme* )सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील (Maharashtra)सुशिक्षित बेरोजगार (Educated unemployed)तरुणांना शासनाने दरमहा 5 हजार रुपयांचा बेरोजगार भत्ता (* Unemployment Allowance* )दिला जातो.


राज्यातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. सुशिक्षित असुनही नोकरी नाही, या गोष्टींचा विचार करुन शासनाकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या भत्त्यामधून तरुणांच्या राहणीमानात बदल होईल.

*योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे*  :
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (मार्कशीट)
ओळखपत्र
अर्जदाराचे आधार कार्ड
वय प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
पत्ता पुरावा
मोबाइल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो

*बेरोजगार भत्ता योजनेसाठी आवश्यक अटी*  :
– या योजनेचा राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना फायदा देण्यात येणार आहे.
– या योजनेंतर्गत राज्यातील सरकार बेरोजगार तरुणांना दरमहा 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करेल.
– या पैशाचा उपयोग युवक त्यांच्या दैनंदिन कामात त्यांच्या नियमित खर्चासाठी करतील.
– बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता देण्यात येईल.
– या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे.
– बेरोजगारी भत्ता निश्चित वेळेसाठी देय असणार आहे.

*योजनेसाठी पात्रता*
– अर्जदार महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
– अर्जदाराचे कमीत कमी वय 21 आणि जास्तीत जास्त 35 वर्षे असावे.
– या योजनेचा फायदा घेणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यजक आहे.
– अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसेल तरच या योजनेचा फायदा घेता येईल.
– या योजनेंतर्गत फायदा घेणारा अर्*

Post a Comment

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Previous Post Next Post