नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आली आता शेतकऱ्यांना लवकरच दुसऱ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात सन २०१९ मध्ये झाली त्याअंतर्गत शेतकऱ्यांना २००० रुपयाचा लाभ दिला जातो.
याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने देखील राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे आतापर्यंत या नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे.
आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे या शेतकऱ्यांना आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार आहे.
या योजनेचा दुसरा हप्ता केव्हा जमा होणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान, याच संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो.
म्हणजेच या चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान या योजनेचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये केला जातोय.
तथापि, हा फक्त दावा आहे याबाबत शिंदे सरकारने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे दुसरा हप्ता 10 फेब्रुवारीपर्यंत मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
Post a Comment
आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!