पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मोफत वीज योजना जाहीर केली. 'पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना' असे योजनेचे नाव आहे. ही रूफटॉप सोलर योजना आहे. या नवीन योजनेद्वारे 1 कोटी घरांना मोफत विजेचा लाभ मिळणार आहे. या योजनेवर सरकार 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे. योजनेत दर महिन्याला 300 युनिटपर्यंत मोफत वीज देऊन 1 कोटी घरे उजळण्याचे उद्दिष्ट आहे.
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सरकार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाईल. यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टल तयार केले जाईल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रित केल्या जातील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. एक प्रकारे हे पोर्टल इंटरफेससारखे कार्य करेल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येईल. या योजनेचा तळागाळात प्रचार करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या भागात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. याशिवाय उत्पन्न वाढवणे, वीज बिल कमी करणे आणि लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता, ही योजना का सुरू करण्यात आली आहे, त्याचे काय फायदे होतील? हे जाणून घेऊया.
Post a Comment
आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!