भारतीय आयुर्विमा महामंडळाची आधारशिला योजना गुंतवणूकदारांना सर्वात कमी गुंतवणुकीत मोठा निधी देते. महिलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे. महिला हळू-हळू थोडे पैसे वाचवून आणि LIC च्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून मोठा निधी जमा करू शकतात.
8 ते 55 वर्षे वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्ही दररोज 29 रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर थोडक्यात जाणून घेऊयात...
उदाहरणार्थ तुम्ही दररोज 29 रुपये वाचवल्यास, तुम्ही एलआयसी आधारशिलामध्ये 10,959 रुपये जमा कराल. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी हे सुरू केले. तर तुम्ही या योजनेत 20 वर्षांसाठी 2,14,696 रुपये जमा कराल. परंतु मॅच्युरिटीवर तुम्हाला 3,97,000 रुपये मिळतील.
काय आहेत या योजनेच्या अटी ?
- LIC ची आधारशिला योजना सुरक्षा आणि बचत दोन्ही देते. ज्यांचे आधार कार्ड बनले आहे, अशा महिलाच याचा लाभ घेऊ शकतात. एलआयसीची ही योजना पॉलिसीधारक आणि त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत करते. पॉलिसीधारकाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर पैसेही मिळतात.
गुंतवणूक किती करावी: एलआयसी आधार शिला प्लॅन अंतर्गत बेसिक सम अश्योर्ड मिनिमम 75000 रूपये आणि कमाल 3 लाख रूपये आहे. पॉलिसीचा किमान कालावधी 10 वर्षे आणि कमाल कालावधी 20 वर्षे आहे. यात 8 ते 55 या वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. तसंच कमाल मॅच्युरिटीची मर्यादा 70 वर्षे आहे. तुही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमिअम भरू शकता.
आणखी माहिती साठी जवळच्या LIC एजेंट शी संपर्क करा
Post a Comment
आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!