हवामान बदलामुळे (Climate change)उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करुन सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून (Government of Maharashtra)नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project)सुरु केला. गांडूळ खत हे शेतातील काडीकचरा, शेण, वनस्पतीजन्य पदार्थ आदिंपासून गांडुळांमार्फत हे बनवले जाते. या खतामध्ये व्हिटॅमिन, संजीवके, विविध जिवाणू तसेच इतर शेतीसाठी(agriculture) आवश्यक जिवाणू असल्याने पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.

*उद्दिष्ट्ये*  :
1. शेतीचा उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्नात वाढ करणे.
2. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पौष्टिक अन्नधान्याचं उत्पादन घेणे.
३. शेतजमिनीची सुपीकता दीर्घकाळापर्यंत टिकवणे.
4. नैसर्गिक घटकांचा वापर करुन शेती करणे.
5. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना मदत करणे.

*पात्रता*  :
– अर्जदाराकडे दोन ते पाच हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी 65 टक्के मदत दिली जाते.
– प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी 75 टक्के अर्थसहाय्य दिले जाते.
– ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी त्यामध्ये अल्प/अत्यल्प भूधारक,अनुसूचित जाती जमाती महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमानुसार फायदा दिला जातो.
– शेतकऱ्यांकडे गांडूळ खत यूनिट उभारण्यासाठी जागा उपलब्ध असणे आवश्यक.
– इतर कोणत्याही योजनेतून शेतकऱ्याने लाभ घेतलेला नसावा.
– गांडूळ खत यूनिट उभारल्यानंतर ते व्यवस्थित सुरु राहण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान दोन जणावरं असावी.

*आवश्यक कागदपत्रे* –
– 7/12 उतारा
– 8- अ प्रमाणपत्र
– जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती-जमातीसाठी)
– सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान खर्चाचा मापदंड-
– सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यूनिट साठी 6 हजार रुपये असा खर्चाचा माप दंड आहे.
– गांडूळ खत उत्पादन यूनिट/नाडेप कंपोस्ट यूनिटसाठी 10 हजार रुपये असा खर्चाचा मापदंड आहे.

*अर्ज कुठे करावा?* 
शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.) 

Post a Comment

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Previous Post Next Post