सरकारने (Central Govt)सन 2017-18 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana)प्रती थेंब अधिक पिक केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना (Micro Irrigation Scheme)राबविण्यासाठी कार्यात्मक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. राज्य शासनाने सन 2018-19 या वर्षासाठी सूक्ष्म सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project)सुक्ष्म सिंचन योजना ठिबक व तुषार सिंचन राबवण्यासाठी मान्यता दिली आहे. त्या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात निवडलेल्या गावांमध्ये ठिबक व तुषार सिंचन योजना राबवली जात आहे.

*योजनेचे उद्दिष्ट*  :
– प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्रात वाढ करणे.
– आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व फलोत्पादन पिकांचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीला चालना देणे.
– कृषी उत्पादनाची गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादनात वाढ करणे.
पाणीवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.

*निवडीचे निकष*  :
– नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म सिंचन या योजनेसाठी अत्यल्प व अल्पभूधार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग, शेतकरी व सर्वसाधारण या प्राधान्य क्रमानुसार लाभार्थी निवड केली जाते.
– शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी.
– सामूहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर सर्व संबंधितांचे करारपत्र आवश्यक आहे.
– उपलब्ध सिंचन स्त्रोतातील पाण्याचा विचार करून, तेवढ्या क्षेत्रासाठी सूक्ष्म सिंचनाचा लाभ हा देय असणार आहे.
– विद्युत पंपासाठी कायमस्वरूपी जोडणी आवश्यक आहे.
– ज्या पिकासाठी संच बसविण्यात येणार आहेत.
– या पिकाची नोंद सातबाराच्या उताऱ्यावर क्षेत्रासह असावी.
– सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद नसल्यास कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून पीक लागवडीचे प्रमाणपत्र घ्यावे.

*ठिबक सिंचनमध्ये समाविष्ठ असणाऱ्या बाबी * :
आउटलाइन
सबसरफेस
मायक्रोजेट

*तुषार सिंचन* 
सुक्ष्म तुषार सिंचन
मिनी तुषार सिंचन
हलविता येणारी तुषार सिंचन
मिस्टर रेनगन
सेमी परमनंट इरिगेशन सिस्टीम

*ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसाठी किती अनुदान मिळणार?* 
– नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या आर्थिक मापदंडानुसार अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थ्यांना 70 टक्के अनुदान मिळणार आहे.
– अल्प व अत्यल्प भूधारक सर्वसाधारण लाभार्थींना 60 टक्के अनुदान देय असणार आहे.

*आवश्यक कागदपत्रे*  :
– पाणी व मृदा तपासणी अहवाल
– कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र
– भौगोलिक स्थान पद्धतीने शेतकरी व तपासणी अधिकाऱ्यांसोबत संचाचे अक्षांश आणि रेखांश फोटोची प्रत
– विक्रेते किंवा वितरक यांच्याकडील बिलांची मुळप्रत टॅक्स इनव्हाईस.

*अर्ज कुठे करावा?* 
या योजनेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन आवश्यक कागदपत्र अपलोड करावीत आणि योजनेचा लाभ घ्यावा.

Post a Comment

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Previous Post Next Post