आपण पाईपलाईन अनुदान योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो? यासाठी अटी-शर्ती काय आहेत?, याचा अर्ज कसा करायचा? या सर्वांबद्दलची माहिती आपण येथे पाहणार आहोत. 
जसे की कोरडवाहू क्षेत्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या प्रकारच्या योजना देखील महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत राबवले जातात. तसेच पीव्हीसी पाईप किंवा एचडीपीए पाईपसाठी देखील याठिकाणी अनुदान दिले जाते.

या योजनेअंतर्गत 50 टक्के किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. ज्यामध्ये पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर आणि जास्तीत जास्त 15 हजार रुपये त्याच बरोबर एचडीपीए साठी 50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 15 हजार रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते. एचडीपी पाईप साठी अर्ज केले असता जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते तसेच पीव्हीसी पाईप साठी अर्ज केला असता जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते.

यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करत असताना आपल्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोत याबद्दलची माहिती प्रविष्ट करणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये शेततळे, विहीर किंवा इतर कोणत्या मार्गाने आपण सिंचन करत असाल तर त्याबद्दल ची माहिती सादर करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. अन्यथा असे अर्ज वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात. त्यावर कोणतीही पुढील कारवाई होत नाही त्याच बरोबर आपल्या सातबाराला देखील या सिंचनाची नोंद असणे बंधनकारक आहे.

अर्ज भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते. त्यामध्ये आपले नाव असल्यास आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये काही कागदपत्रे सादर करावी लागतात. ज्याच्या मध्ये आपल्या जमिनीचा सातबारा, ८अ, बँकेचे पासबुक व ज्या ठिकाणी आपण पाईप खरेदी करणार आहोत त्या डीलरशिप चे कोटेशन इत्यादी माहिती सादर करावी लागते. 

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी. 

Post a Comment

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Previous Post Next Post