📰 *पारधी समाजाच्या लाभार्थींनी विविध योजनांसाठी* ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत 

📰 *मृद व जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविणार* – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

👨‍🌾 *‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’तून आता* खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

👨‍🌾 *शेळी, कुक्कुटपालन योजनांच्या धर्तीवर मेंढ्यांसाठीही* अर्धबंदिस्त निवारा योजना प्रायोगिक तत्वावर राबवावी – उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

📰 *तेलंगणाच्या निवडणुकीसाठी BRS पक्षाच्या 115 उमेदवारांची यादी जाहीर*, मुख्यमंत्री केसीआर दोन मतदारसंघातून लढणार

🧅 *तुम्हाला शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही*; कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावल्याने राजू शेट्टींचा हल्लाबोल

😱 *2024 मध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान* बदलून ‘नरेंद्र मोदी संविधान’ लागू होईल. - ललन सिंह

👨‍🎓 *पहिल्या सत्रात सर्व्हर डाऊन, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित;* गोंधळामध्ये तलाठी भरती परीक्षा पार 

👨‍⚖️ *राहुल शेवाळे बदनामी प्रकरण;* उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 15 हजारांचा जामीन मंजूर 

🎓 *तलाठी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार;* गोंधळानंतर महसूल मंत्र्यांचं स्पष्टीकरण 

👨‍⚖️ *मणिपूर हिंसाचारप्रकरणी स्थापन केलेल्या* समितीकडून सुप्रीम कोर्टात 3 रिपोर्ट सादर 

😶 *बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी;* सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

🌒 *चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चांद्रयान-3 चं "वेलकम बडी*" म्हणत केलं स्वागत

👨‍⚕️ *43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी* डॉ. जगदीश कदम यांची निवड

🏠 *महाराष्ट्र सरकार लवकरच गिरणी* कामगारांसाठी 500 घरांची सोडत काढणार

🛣️ *यापुढे समृद्धी महामार्गावर फोटो काढण्यास मनाई असेल* तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास पाचशे रुपये दंड आणि एक महिन्याचा कारावास होणार असा निर्णय वाढत्या अपघातामुळे महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. 

🏫 *यवतमाळ मधील मांगलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकून जगाला नवे संशोधन* देणाऱ्या डाॅ. विवेक पोलशेट्टीवार ह्या तरुण शास्त्रज्ञाचा समावेश आता जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये झाला आहे.  

👌 *प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड 'कॅरेटलेनने' आपला उर्वरित 27 टक्के हिस्सा विकला* असून टाटा समूहाने कॅरेटलेनचा उर्वरित हिस्सा खरेदी केला आहे. त्यामुळे आता कॅरेटलेन पूर्णपणे टाटा समूहाचा ब्रँड बनला आहे.

👮 *मोठी बातमी ! नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ग्रामीण पोलिसांनी* ६२६२ ७६ ६३६३ ही स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे.

🪙 *अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत अचानक वाढ झाली आहे.* यामुळे ते पुन्हा एकदा जगातील टॉप-20 श्रीमंतांच्या यादीत आले आहेत. 

💵 *बलूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार,* गौतम अदानी यांच्या नेट वर्थमध्ये गेल्या 24 तासांत 2.92 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 24,268 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Post a Comment

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Previous Post Next Post