📰 *आपले गाव आपल्या योजना - आजच्या ठळक घडामोडी*
➖➖➖➖➖➖➖➖➖
🏦 *रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.* बँका आणि इतर वित्तीय संस्थांना व्याजदर पुन्हा सेट करताना कर्जदारांना निश्चित व्याजदर निवडण्याचा पर्याय द्यावा, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
📰 *काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाल्यानंतर* राहुल गांधी पुन्हा एकदा त्यांच्या अमेठी मतदार संघातूनच निवडणूक लढविणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी केली आहे.
🇨🇳 *चीनची दिग्गज रिअल इस्टेट कंपनी 'चीन एव्हरग्रेन्डने' अमेरिकेच्या न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.* एव्हरग्रेन्ड ही जगातील सर्वात जास्त कर्ज असलेली कंपनी आहे.
🛢️ *केंद्र सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करणार आहे,* ज्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील. तसेच, भाज्यांचे दर कमी करण्यासाठी देखील पाऊलं उचलली जाणार आहेत. यासाठी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून सुमारे 1 लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
🪭 *विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी आहे.* विद्यार्थ्यांना मानसिक आधार आणि सुरक्षा देण्यासाठी कोटा प्रशासनाने सर्व हॉस्टेल आणि पीजींमध्ये स्प्रिंग-लोडेड सीलिंग फॅन बसवण्याचे आदेश जारी केले आहेत.
🗣️ *महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द;* राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
🗿 *ITI मधील शिल्प कारागिर प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 500 रुपये*; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
🏅 *रतन टाटा यांना पहिला महाराष्ट्र उद्योग पुरस्कार,* तर आदर पुनावाला यांना उद्योगमित्र पुरस्कार जाहीर
🍅 *सर्वसामान्यांना मिळणार दिलासा;* टोमॅटो दर 30 टक्क्यांनी घसरणार
🛰️ *चंद्र आता दृष्टीक्षेपात* ! चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलचे पहिले डीबूस्टिंग ऑपरेशन यशस्वी
✍️ *तलाठी भरती परीक्षेत पेपरफुटीचे भूमी अभिलेखकडून खंडन*; दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई
🚆 *सर्वात महत्त्वाची बातमी!* पुण्यातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रविवारी रद्द
🏢 *संवैधानिक संस्थांमध्ये RSS ची लोक*, मंत्रालयाच्या निर्णयात हस्तक्षेप; राहुल गांधींचे टीकास्त्र
🎋 *100 वर्षांमधील सर्वात कोरडा ऑगस्ट,* पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती
🤑 *सरकारी पैशावर मिरवून घेण्याची हौस म्हणजेच* शासन आपल्या दारी उपक्रम, रोहीत पवार यांचा हल्लाबोल
➖➖➖➖➖➖➖➖➖